चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील रुई गावाच्या परिसरात दि. 20 मार्च 2024 रोजी वाघ मृत अवस्थेत पडून असल्याची वनविभागाला माहिती मिळताच, तात्काळ वन विभागाचे अधिकाऱ्यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले व त्यावरून वाघाची शिकार अवैध प्रकारे केली नसल्याचे निदर्शनात आले. तसेच मृत वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत असून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उत्तरीय तपासणी वरून सदर वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज दर्शविण्यात आला. शवविचेदन योजना NTCA यांच्या कार्यभुत प्रलानिनुसार करण्यात आला.
सदर ची संपूर्ण कार्यवाही मान. भारत सिंघ हाडा यांच्या मार्गर्शनाखाली मनोज धनविजय सहायक वनसंरक्षक, विजय गंगावणे सहायक वनसंरक्षक, सौ. सारिका वैरागडे वन परिक्षेत्र अधिकारी, प्रमोद वाडे वनपरिक्षेत्र अधिकारी, पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उत्तरीय तपासणी, NTCA चे प्रतिनिधी अनिल दशहरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव प्रतिनिधी, मानद वन्यजीव रक्षक, सातपुडा संस्थेचे मंदार पिंगळे, वनपाल रमधम आदी उपस्थित होते.