मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यास काही उपाय योजना करणे गरजेचे – विलास कोसनकर वनपाल बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ चिचपल्ली

0
201

चंद्रपूर : चद्रपुर वनविभागाअंतर्गत वनविभाग आणि नवनिर्मिती सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गापुर ग्रामपंचायत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली. सदर कार्यशाळे मध्ये उपस्थितांना विलास कोसनकर वनपाल बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी यावेळेस ग्रामस्थांना सांगितले की घराजवळील रस्त्यालगतचे परिसराची साफ-सफाई स्वच्छ ठेवणे  गरजेचे आहे. तसेच कोंबड्या – बक-याचे मांसाचे तुकडे, घाण गाव शेजारी उघड्यावर न फेकता खड्यात टाकुन बुजविणे गरजेचे आहे. जेणेकरून वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर असे मांसाहारी हिंस्त्र वन्यप्राणी सड्क्या मांसाच्या वासाने गाव शेजारी व गांवात येणार नाहीत. तसेच गाव शेजारील अनावश्यक झुडपे ग्रामस्थ स्वयं प्रेरणेने तोडून क्षेत्र साफ-सफाई ठेवणेही तेवढेच जबाबदारी आहे. वनक्षेत्रालगत  एकटे न जाता समूहाने बोलत, आवाज करीत, मोबाईलवर गाणे वाजवित चालायला पाहीजे. जेणेकरून हिंस्त्र प्राणी आपल्याकडील आवाजाने दूर जातील आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यास  मदत होईल.

यावेळी कार्यशाळेला उपस्थित पुणेकर उपसरपंच दुर्गापुर, अमोल बैस माजी मानद वन्यजीव रक्षक, दिपक वांढरे, अध्यक्ष निसर्ग सखा संस्था, अजय तिजारे क्षेत्र सहाय्यक दुर्गापुर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष, नवनिर्मिती सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांनी संचालन करून सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here