
तळोधी (बा.) यश कायरकर
वनपरिक्षेत्र तळोधी (बा.) अंतर्गत तळोधी बिटातील सावर्ला या गावातील चौकात आलेल्या चितळाला गावकऱ्यांनी कुत्र्यां पासून संरक्षण करुन ठेवले. व नंतर सावर्ला येथील पोलिस पाटल़ यांनी वन विभागाला सुचना दिली. वनविभागाच्या ताब्यात घेऊन एक वर्ष वय असलेल्या चितळाची वैद्यकीय तपासणी करून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
रात्री बिबट्याने पाठलाग केल्यामुळे हा चितळ रात्री गावात आलेला असावा व कुठेतरी लपलेला असावा असा अंदाज आहे. विशेष म्हणजे याच गावात रात्री बिबट्याने गोठ्यात घुसून सुभाष गोपाले यांच्या चार शेळ्यांना मारले. आणि त्या नंतर सायंकाळी गावातुनच हा चीतळ जंगलात जाण्याकरिता निघाला. मात्र. तारांच्या कुंपणाला अडकून किरकोळ जख्मी झालेला होता. यावेळी तळोधी बा. वनक्षेत्र सहायक के.डी.गरमडे, वन रक्षक एस.बी. पेंदाम, वन मजूर सोमेश्वर निकूरे, स्वाब नेचर केअर संस्था’चे अध्यक्ष, वन्यजीव प्रेमी यशवंत कायरकर, सर्पमित्र जिवेश सोयाम, पोलीस पाटील सौ.अपुर्वा मेश्राम हे उपस्थित होते
