ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कॅण्टर (ओपन बस) करिता आलेल्या पर्यटकांनी केला मोहर्ली बुकिंग काऊंटरवर वाद

0
3586

 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली (कोअर) गेटवर आज दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी दुपारी फेरी दरम्यान मुंबई वरून आलेले पर्यटकांनी केला बुकिंग काऊंटर वर वाद.
कैन्टरला उशीर झाल्यामुळे त्यांना मोहर्ली गेटवर वेळेवर न आल्यामुळे कैन्टरची टिकिट बुकिंग काउन्टर असलेल्या पर्यटकाना देण्यात आले.
पर्यटक जेव्हा गेटवर आले त्या वेळेस त्यांच्या समोर कैन्टर बस सोडण्यात आली हे बघून पर्यटक चिडले बुकिंग काउन्टर जाऊन तिकीट दाखविले असता तुम्ही लेट झाले कैन्टर सोडण्यात आली.

पर्यटक म्हणाले आम्ही लाबुंन मुंबई वरुन आलेले कैन्टर बस ऑनलाईन बुकिंग होती आम्हची वाट न बघता व बुकिंग स्लिप वर मोबाईल नंबर असताना देखील त्यांनी कैन्टर सोडण्या पूर्वी गेट वरुन कॉल का केले नाही. आम्ही गेटवर पोहोचताच कॅण्टर दुपारी 2.45 वाजता सोडण्यात आली ते थांबविता येत होते का थांबविन्यात आले नाही.

कैन्टर जात असतानी बघून पर्यटक तुरंत काऊंटरवर गेले व आपली स्लिप दाखविली त्यांना सांगण्यात आले की तुम्ही उशिरा आले त्यामुळे कॅण्टर सोडण्यात आले. यावर पर्यटकांनी त्यांच्याशी वाद केला आम्ही एवढ्या लांबून आल्यावर बुकिंग केले असतात तुम्ही आम्हची वाट न बघता कैन्टर सोडले कसे आमचे पैसे परत करावा अन्यथा आम्हाला दुसरी कैन्टर उपलब्ध करून द्यावा जे आपल्या कड़े हाजर आहे असे वक्तव्य त्यांनी केले.
पर्यटकानी त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईल वरच्या चर्चा केली पण अधिकाऱ्यांनी देखील त्यांना मदत केली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या घटना या आधी पण झालेली आहे. तसेच कोंडेगाव चेकिंग गेटवर देखील रात्री येणाऱ्या पर्यटकाना खुप त्रास सोसावा लागतो बरेचदा ट्रेन लेट असल्यामुळे येणारे पर्यटकांना उशिर होतो त्यामुळे रात्री चेक पोस्ट वर अडवीले जातात बुकिंग स्लिप दाखविल्यावर सुध्दा त्यांना सोडण्यात येत नाही अशा वेळेस सम्बंधित कर्मचारीला फोन लागत नाही त्यांना रात्र गाड़ी मध्ये काढावा लागतो. हे खुप शोकांतिक आहे.

जग प्रसिद्ध ताडोबा पण येथील मैनेजमेंट वर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.यावर वनसमाचार चे प्रतिनिधिनी काही पर्यटकांशी चर्चा केले असता त्यांनी म्हटले की इतर राज्यात जंगल सफारी तेथील पर्यटन विभाग पाहतो तसे महाराष्ट्रात MTDC महाराष्ट्रा पर्यटन विकास महामंडळ कड़े सोपविण्यात यावे व वन विभागाने आपला जंगल राखावा यावर प्रशासनाने विचार करावे आम्ही हजारो कि.मी. दूरुन प्रवास करून पैसा खर्च करून सफारी करिता येतो व येथे  आल्यावर हे सगड़े सोसावा लागते. भविष्यात पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याकड़े लक्ष देने फार गरजेजे आहे. अन्यथा येथे येणारे पर्यटकांची संख्या कमी होणार असे पर्यटकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here