ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या धोरणानुसार नवीन जिप्सी लावणे व जिप्सी मालक स्थानिक / गैर स्थानिक अहवाल तयार करण्याबाबत विशेष चर्चा सत्राचे आयोजन आज दिनांक 20 सेप्टेम्बर 2021 रोजी 12.00 वाजता ग्रामपंचायत मोहर्ली येथे मोहर्ली गट ग्रामपंचायत व ग्राम विकास परिस्थितीकी समिती मोहर्ली यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
ताडोबा मोहर्ली (कोर) पर्यटन प्रवेशद्वार येथील नोंदणीकृत 59 जिप्सी धारकापैकी स्थानिक / गैरे स्थानिक जिप्सी धारक ठरविण्यात आले.
यावेळेस सुनिता कातकर सरपंच, विकास गेडाम उप सरपंच, वाय.के.वेस्कडे सचिव गट ग्रामपंचायत मोहर्ली, सदस्य मधुकर लोनवले, अरविंद मगरे, राजेंद्र मेश्राम, भावना मगरे, सुवर्णा शेंडे, सुरेखा मेश्राम, ग्राम परिस्थितिकी विकास समिती अध्यक्ष बंडू कुमरे, शहनाज बेग उपाध्यक्ष, राजू ढवळे साईनाथ गरमडे, विलास शेंडे वंदना शेंडे, संजय मोंढे, संजय मानकर, रामकृष्ण साखरकर पोलीस पाटील मोहर्ली, विलास कोसनकर, क्षेत्र सहायक मोहर्ली (कोर) मल्लेलवार क्षेत्र सहायक मोहर्ली (बफ़र) आदि उपस्थित होते.