मोहर्ली येथील वृद्ध इसम अस्वलीच्या हल्ल्यात गंभीर जखमी

0
683

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या मोहर्ली येथील एका इसमावर अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केलेची घटना उघडकीस आली.

सदर घटना  दिनांक २० जुलै २०२२ रोजी दुपारच्या सुमारास घडलेली असून जखमी इसमाचे नाव दयाराम तोंडासे वय अंदाजे 65 वर्ष असून मोहर्ली येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहिती नुसार मोहर्ली गावावरून २.०० किमी अंतरावर असलेल्या जुनोना गावात आपल्या नातेवाईकाकडे जात असतांना अचानक अस्वलीने हल्ला करून जखमी केले.
सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळतात वन विभागाचे कर्मचारी आपल्या चमू सोबत घटनास्थळी दाखल झाले व जखमी दयाराम तोंडासे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारा करिता पाठविण्यात आले असून जखमी दयारामच्या डाव्या हाताला 17 टाके लावण्यात आले आहे. पुढील तपास वनविभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here