बिबट्याने केले घरात घुसून महिलेला जखमी : परिसरातील ही दूसरी घटना

0
255

सावली :

सावली तालुक्यातील वाघोली गावातील एका घरात घुसून बिबट्याने केले महिलेला जखमी आज दिनांक 20 जुलै 2021 सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास घरात घुसून बिबट्याने हल्ला करून महिलेस घराबाहेर खेचले व यात तिला गंभीर जखमी केले. जखमी महिलेचे नाव तुळजाबाई म्हशाखेत्री असे आहे. तिला बाहेर खेचतांना आवाज येताच घरा शेजारी उठले आणि त्यांनी बिबट्याला घराबाहेर जाताना बघितले. तुळजाबाईवर हल्ला करण्यापूर्वी बिबट्याने कोंबड्यावर ताव मारले होते. जखमी महिलेचा उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत.

काही दिवसापूर्वी व्याहाड बुज येथील घरात घुसून बिबट्याने महिलेला ठार केले होते.ही घटना ताजी असतांना याच परिसरात सतत दुसरी घटना घडल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.
सदर घटनेची माहिती गावातील नागरिकांना होताच बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो जंगलात परत निघून गेला. घरात घुसून जीव घेणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाने लवकरात लवकर करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here