प्राणी मित्राच्या घरी छापा, अवैधरीत्या बाळगलेले 38 पक्षी व प्राणी ताब्यात ; सांगली वन विभागाला यश

0
2560

दिनांक 17 जून 2021 रोज गुरुवारी सांगली येथील विजयनगर परिसरातील प्राणी मित्र अशोक दादा लकडे , पीपल्स फॉर अनिमल ( पश्चिम महाराष्ट अध्यक्ष )  घरी छापा टाकण्यात आले. यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राणी मित्राचा घरात अवैधरित्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रजातीचे 38 पक्षी व प्राणी ताब्यात घेऊन त्या प्राणीमित्र अशोक लकड़े वर गुन्हा दाखल करण्यात आला व लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

उपवनसंरक्षक विजय माने यांच्या महितीं नुसार सदर प्रकरणार आणखी कोणी सहभागी आहे का ? याची सखोल चौकशी वन विभागा तर्फे करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार प्राणी मित्राच्या घरात अवैध रित्या वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी व पक्षी बाळगल्या जात होते
याची माहिती मिळताच वन विभागाने कारवाई केल्याचे सांगितल्या जात आहे.
तपास दरम्यान प्राणी मित्राच्या घरी 26 घारी, 1घुबड़, 1 गाय बगळा, 2 काळे करकोचा, 1 गरुड़, 2 माकड़, 4 कासव व एक मृत घार अशी 38 पक्षी व प्राणी ताब्यात घेतले आहेत.
उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या उपस्थितीत झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here