ताडोबाच्या मोहर्ली येथे जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त मॅराथॉनचे आयोजन

0
264

Happy Mouth is a Happy Mind” या संदेशासह जनजागृती उपक्रम यशस्वीपणे पार पडला

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग)

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली परिसरात आज दि. 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त मौखिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले. वन विभाग, जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, अॅटपार व्हिजन फाउंडेशन, नागपूर आणि तथास्तु रिसॉर्ट, मोहर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

ही मॅराथॉन मोहर्ली रेंज ऑफिसपासून सुरू होऊन आगरझरी गेटपर्यंत आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मौखिक आरोग्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तंबाखू, खर्रा, गुटखा, सिगारेट यांसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम जनतेसमोर मांडणे हा होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मौखिक आरोग्यावर आधारित माहितीपूर्ण सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये
डॉ. संदीप पिपरे (जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी),
डॉ. आकाश कासटवार, डॉ. नितीन जनबंधू (ग्रा. रुग्णालय, बल्लारपूर), डॉ. सुप्रिया वाघमारे, डॉ. रोमल शेंडे, डॉ. दीपशिखा मुसळे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर) यांनी दातांची निगा, व्यसनांचे परिणाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सहभागी सर्वांनी “तंबाखू, खर्रा, बीडी आणि सिगारेटपासून दूर राहण्याची” शपथ घेतली. मॅराथॉनची टॅगलाइन “Happy Mouth is a Happy Mind” ही होती, जी आरोग्यदायी तोंडामधून आनंदी मनाचा संदेश देते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) ले. कुशाग्र पाठक व उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी येल्लू यांचे विशेष सहकार्य लाभले.

उपसंचालक (बफर) ले. कुशाग्र पाठक यांनी सांगितले की, “ताडोबा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याघ्र प्रकल्प आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संपर्कात स्थानिक नागरिक येतात. त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होऊ नये, यासाठी जनजागृती आवश्यक आहे.”

उपसंचालक आनंद रेड्डी यांनी देखील मौखिक आरोग्याच्या संरक्षणावर भर देत सांगितले की, “स्थानिक नागरिकांनी गुटखा, खर्रा, सिगारेट यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा.”

या कार्यक्रमाला मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक एस.डी. जुमडे, पी.पी. ढाले, वनरक्षक, गेट मॅनेजर व वन्यजीव प्रेमी हिमांशू बागडे, झिरो वेस्ट मॅनेजमेंटच्या कु. चारुल परिहार, पर्यटन व्यवस्थापक, पी.आर.टी. सदस्य, मौखिक आरोग्य कक्ष व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते.

तथास्तु रिसॉर्टचे महाव्यवस्थापक जितेंद्र नोनिया, हेड शेफ राजेश यादव, शिवाजी घाटकिणे, चंदन शाहू, विजय डांगे, हेमंत, प्रफुल्ल, अक्षय, विनोद, व्यंकटेश (निसर्गवादी) व इतर कर्मचारी यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली. मॅराथॉनमध्ये सहभागी झालेल्यांसाठी आगरझरी गेट येथे तथास्तु रिसॉर्टच्या वतीने चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती.

तसेच होमस्टे असोसिएशन चे अध्यक्ष सुलेमान बेग, मंगेश लामगे आणि मुकेश शिवणकर आदि उपस्थित होते.

हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला असून, सर्व उपस्थितांनी उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले. नागरिकांनी भविष्यातही अशा जनहितकारी उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here