खवले मांजर प्रकरणी 72 तासातच वनविभागाची कार्यवाही ; 3 आरोपी जेरबंद एकूण 5 ताब्यात

0
903

गडहिंग्लज:
दि. १५ एप्रिल रोजी खवले मांजर प्रकरणी फरार आरोपी प्रमोद पांडुरंग पताडे वय वर्ष ३५, अमर नारायण कानडे वय वर्ष ४०, युवराज राणोजी शिंदे वय वर्ष २१ यांना दि.१९ एप्रिल रोजी परिक्षेत्र वनअधिकारी आजरा अमरजित पवार यांचे मार्गदर्शनाखाली ३ भरारी पथके नेमून विविध ठिकाणी धाडी टाकून आरोपीना गुन्ह्यातील वापरण्यात आलेल्या मुद्देमालासह ( वाहनसह ) ताब्यात घेतले असून आरोपीवर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ , ३९ (१-A D), ३९ (२), ३९ (३) – A .B.C , ४४, ५०, ५१ A , ५२ यांचे उल्लंघन अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे व कायदेशीर कार्यवाही व तपास सुरु आहे .
तसेच गुन्ह्या बाबत तस्कराची जाळे उघडकीस आणण्यास आर.आर. काळे उपवनसंरक्षक कोल्हापूर, बिराजदार सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.


या कार्यवाही मध्ये अमरजित पवार परिक्षेत्र वनअधिकारी आजरा,वनपाल .बी.एल.कुंभार, डी.बी.काटकर, एस.पी.गुरव, बी.बी.न्हावी, वनरक्षक कृष्णा डेळेकर रणजित पाटील, नागेश खोराटे, शिवाजी लटके, राहुल कांबळे, तानाजी कळवीकट्टीकर, गुरुनाथ नावगेकर, लक्ष्मण पाटील, मारुती कांबळे व आजरा रेंज मधील वनसेवक यांनी सहभाग घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here