जागतिक चिमणी दिवस

0
218

सर्वात प्रथम अगदी लहानपणीच ओळख करून दिल्या जाते चिवताई. सर्वाची परिचयाची सदैव घरात येवुन चिवचिवाट करणारी खिडकीतून किंवा झरोक्यातून घरात येवुन चिवचिवाट करणारी ही चिमणी सर्व ठिकाणी व मानववस्तीत राहणारा हा पक्षी. लवकर जवळ येणारी चिवताई. एका सुरात चिव, चिव, चिरर,चिरर’ असा ओरड असतो.पिसे पसरून, पंख खाली वर करून व शेपटी नाचवीत जमिनीवर पडलेले धान्याचे बी व दाणे ठिपणारी हेच त्यांचे मुख्य अन्न, पण तसेच विशेषतः पिलांची वाढ कीटक व अळ्या ह्याच अन्नावर केली जाते.
फोटो मागे व झरोक्यात लहानसा खोपा करून त्यात पिल्ले दिलेली आपण पाहिले आहे. पण आता जुने वाडे चाळी जाउन त्या जागी आता खिडक्यांवर काच व परदे आले आणि Ac आल्याने हवेचे झरोके पण नाहीसे झाले. सिमेंटचे ताव बंद घरे झाल्याचे त्यांना घरट्या साठी जागा राहीली नाही रस्त्यावरची माती जाऊन त्याची जागा डांबरी व सिमेंट व डांबरीकरण घेतली आहे. आजुबाजुच्या उरलेल्या जगेवर पेवर आलेत, त्यामुळे त्यांना पंख किंवा त्वचेवरील धुळ, तेलकटपणा व परजीवी पासुन सुटका करुन घेण्यासाठी धुळ स्नान करायला मातीच राहीली नाही तसेच परस बागा नाहीसे झाल्या मुळे पाण्यात डुबुन अंघोळ करायला झुळझुळ वाहणारे पाणी राहीले नाही. त्यामुळे यांचे गावातील वास्तव्य पण कमी झाले. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मजबुरीने पाईपच्या छिद्रात किंवा जुन्या घराच्या छपरातील जागा मिळेल तिथे गवताच्या काड्या, कचऱ्यानी घरटे तयार करण्याची घडपड आपण पहातो.
आजही सकाळ संध्याकाळचे वेळी मोकळ्या मऊ मातित व लहानशा पाण्याच्या दोबरात डबक्यात खेळताना सकाळी, दुपारी व उतरणीला प्रचंड संख्येने त्यांच्या आवडत्या झाडावर जमतात व कलकलाट करीत असतात. आजकाल हे खेड्यातून पहायला मिळते.
तर चला पुन्हा आपल्या बालपणीच्या मित्रांना हक्काचे घर व दानापाणी देऊन त्यांचे संवर्धन करुव व घरा जवळ सावलीत मातीच्या भांड्यात पक्ष्यांना पाणी ठेवु.


देवेंद्र तेलकर
मा.मानद वन्यजीव रक्षक
अध्यक्ष सुष्टी वैभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here