
तळोधी (बा.) (यश कायरकर)
तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत, तळोधी बिटातील सावर्ला येथे बिबट्याने गोठ्यात घुसून ४ शेळ्यांची शिकार केली. जातांना कोंबडी घेऊन गेला.
सविस्तर, सावर्ला गाव हा जंगला शेजारीच असुन गावाभोवती झुडपे आहेत. त्यामुळे या गावात बिबट्यांचे शेळ्यांना मारने नवीन नाही. काल रात्री सुमारे (दिड वाजता) १:३० मिनिटांनी गावाच्या शेजारीच असलेल्या श्री सुभाष नामदेव गोपाले यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने त्यांची एक शेळी व तीन बकरे असे एकूण चार शेळ्यांना मारले. व ते बांधून ठेवले असल्याने बाजूला असलेल्या कोंबड्याला घेऊन जंगलात पसार झाला. गोपाले यांना काहीतरी आवाज आला.तेव्हा त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली.असता त्याच्या आवाजाने बिबट्याने जंगलात पळ काढला.
ही माहिती मिळताच सकाळी तळोधी वन क्षेत्र सहायक श्री के.डी.गरमडे, वनरक्षक श्री एस.बी.पेंदाम तळोधी बिट यांनी मोक्का पंचनामा केला. व म्रृत शेळ्यांना पुरून देण्यात आले.व नंतर घटनास्थळी फाॅक्सलाईट व कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले.
