घुगूस व ताडाली येथील कंपनीचे विस्तारीकरण रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धन व विकास समिती, चंद्रपूर तर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवेदन

0
105

पर्यावरण संवर्धन व विकास समिती, चंद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांना दि.18 जानेवारी 2023 रोजी निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात अगोदरच प्रदूषणाने थैमान घातले असून जिल्ह्यात लहान मोठे 1000 उद्योग आहेत. त्यात 100 मोठे तर 900 लहान उद्योग असुन 30 ते 35 कोळसा खाणीची त्यामध्ये भर पडली आहे.


त्यामुळे देशातील तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव आघाडीवर आहे .अशातच लॉयड मेटल इंडस्ट्रीज घुगुस व ग्रेस इंडस्ट्रीज तडाली यांनी तर प्रदूषणाच्या सर्व सीमा ओलांडल्या असूनही पुन्हा विस्तारीकरणासाठी शासनाकडे परवानगी मागितलेली आहे.
या कंपन्यांच्या विस्तारीकरणामुळे भविष्यात उद्भवणारे धोके लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस व ताडाळी येथील लॉयड मेटल कंपनी व ग्रेस इंडस्ट्रीजचा विस्तारीकरण थांबविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली, तसेच अन्य एका निवेदनात ताडाळी येथील गोपनी, सिद्धबली, ग्रेस, चमन मेटॅलिक व धारिवाल या कंपन्यांमुळे  मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे जमीन नापीक होत आहे, सोबतच धारिवाल कंपनीच्या पाईप लाईन मुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे दलदलीत रूपांतर झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे कंपनीच्या राखे मुळे नुकसान होत असून पिकांना हवे तेवढे भाव मिळत नाही ,त्यामुळे शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावे.

तसेच प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून लोकांना दमा अस्थमा फुफ्फुसाचे विकार डोकेदुखी सर्दी सारखे बिमाऱ्या होत आहेत. सोबतच प्रदूषणाचा परिणाम येथील प्राण्यांवर सुद्धा दिसून येत आहे. त्यामूळे परिसरातील लोकांसाठी आरोग्य सुविधा कंपनीकडून उपलब्ध करण्यात यावे.

या कंपन्यांनी बोटावर मोजण्या इतक्या स्थानिकांनाच कंपनीत घेतले असून बाकीचे बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, परंतू स्थानिकांना रोजगार न देता बाहेरील लोकांना रोजगार मिळवून दिलेला आहे. त्यामूळे स्थानिकांना प्राधान्य देऊन कंपनीत रोजगार उपलब्ध करून द्यावा,
या कंपन्यांमुळे स्थानिकांना प्रदूषित पाणी मिळत असून यावर उपाय योजना करित  प्रदुषण वाढविणाऱ्या संबंधित कारखान्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच वरील मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास पर्यावरण संवर्धन व विकास समिती तर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धन विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डी.के.आरीकर, महिला जिल्हाध्यक्ष स्वाती दुर्गमवार, उपाध्यक्ष दिनेश एकवनकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण जुमडे, जिल्हा संघटक ओमप्रकाश यंगलवार व जिल्हा महासचिव खेमचंद मेश्राम, सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here