
पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुकरांपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केरळ हायकोर्टाने पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुकरांना मारण्याची परवानगीचा मोठा निर्णय दिली आहे. दिनांक 17 दिसंबर 2021 रोजी शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुख्य वन्यजीव वॉर्डन यांना आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना रानडुकरांना मारण्याचे आदेश देऊ शकतात.
वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 11/1/B अंतर्गत, पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुकरांना आता मारले जाऊ शकणार आहे.
केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी.बी. सुरेश कुमार यांनी अंतरिम आदेश जारी करताना राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच न्यायमूर्ती पीबी सुरेश कुमार म्हणाले की, हायकोर्टाला हा अंतरिम आदेश द्यावा लागला कारण राज्याची संपूर्ण यंत्रणा वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी रोखण्यास पूर्णपणे असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे या आदेशाचे पालन करून एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. अँलेक्स एम. स्कारिया आणि अमल दर्शन हे शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित होते.
