
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
सावली वनपरिक्षेत्रातील सावली कवठी गावाचे शाळकरी मुली शाळेत जात असतांना जंगली डुकरांनी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले व त्यानंतर शेतशिवारात काम करत असलेल्या इसमांवर हल्ला केला यात एक इसम ठार झाला तर या हल्ल्यात 3 शाळकरी मुली व 3 शेतकरी गंभीर जखमी असून गडचिरोली व सावली येथे उपचार सुरु आहे.
सावली विद्यालयात शिकत शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनी हे सकाळी 10 वाजताच्या दरम्यान कवठी वरून शाळेत निघाले असता कवाडी जवळ जंगली डुकरांनी हल्ला चढवीला. त्यात अनुराधा गंभीर जखमी झाली व दोन मुलींना दुखापत झाली आहे. त्या नंतर तोच जंगली डुक्कर शेत परिसरातील शेतात काम करणारे आनंदराव चौधरी रा. सावली व गावातील अशोक आकुलवार त्यांचे घरामागे एका महिलेसह दोन इसमावर हल्ला चढवीला त्यात दोन इसम गंभीर जखमी झाले. मात्र गंभीर जख्मी आनंदराव चौधरी यांची मृत्यू झाली आणि गंभीर असलेल्या सुरेश आकुलवार हे गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती असून त्या सोबत तनु भास्कर नायबनकर, दुर्गा दहेलकर, केशवी लालाजी पाल या शाळकरी मुलींसह महीला निर्मला आकुलवार, स्वप्नील आकुलवार या यांचेवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सदर घटनेची तपास सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे सह वन कर्मचारी व सावली पोलीस करीत आहे व तसेच परिसरातील नागरिकांनी हल्ला करणाऱ्या जंगली डुकराचे बंदोबस्त करण्याची मागणीवन विभागाकडे केली आहे.
