
चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या देवाडा गावातील मीराबाई मडावी यांचे राहते घर कुळा मातीचे असलेले दि. १८ जुलै २०२२ रोजी सतत सुरू असलेल्या पावसामुळे पडले असून घरातील सदस्याना कोणतेही दुखापत झालेली नाही. घर पडल्याने परिवार उघड्यावर आलेला आहे.
सदर घटनेची माहिती ग्रामसेवक युवराज वेसकडे यांनी पाहणी करून पटवारी खुशाल मस्के यांना दिली व माहिती मिळताच पटवारी खुशाल मस्के, कोतवाल अतुल खापे यांनी घटनास्थळी पोहचून मौका पंचनामा केला व आपल्या वरिष्ठ आधिकारीला घटनेची माहिती दिली.
शासना तर्फे नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावे.
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता सरकारने ओला दुष्काळ घोषित करावा.
