
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधि)
तळोधी बा.
ब्रह्मपुरी वनविभागातील तलोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेटी बिटातील संरक्षीत वन कक्ष क्रमांक 691 मध्ये आकापुर येथील गुराखी खटू भानूजी कुंभरे वय ६५ वर्षे हा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सदर मृतक गुराख्या चे नाव खठू भानू कुंम्बले वय 65 वर्षे आहे सदर गुराखी नेहमी प्रमाणे आपली गुरे घेऊन जंगलात गुरे चरण्यासाठी गेला होता. मात्र जंगलात चरत असलेल्या गाईवर वाघाने हल्ला केला असता त्या गाईला सोडविण्यासाठी गेला असता वाघाने गुराख्यास ठार केले. मोका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्करीता नागभीड येथे पाठविण्यात आला.
सदर मृतक गुराख्या च्या कुटुंबाला 20000ची तातडीची मदत केली.
यावेळी तळोधी बाळापुर ते वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर .ढोंडणे क्षेत्र सहाय्यक के.डी. गरमळे ,गंगासागर बिठाचे वनरक्षक कुळमेथे, वनरक्षक चौधरी, आलेवाही बीड वनरक्षक पी. एम. गायकवाड, तळोधी वनरक्षक श्री पेंदाम इत्यादी वनरक्षक हजर होते. मोक्याच्या ठिकाणी तिन कॅमेरे लावण्यात आले. पुढील तपास तळोधी वनविभाग व पोलीस विभाग करीत आहे.
