गडचिरोली मध्ये दिभना गावात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
164

गडचिरोली जिल्ह्यातील दिभना गावात वाघाने हमला करून ठार केल्याची घटना दिनांक 18 मई 2021 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघड़किस आली
सदर घटनेत मृत महिलाचे नाव वंदना अरविंद जेंगठे वय (40) वर्ष होते. जंगल परीसरात रानभाजी म्हणुन ओळखली जाणारी कुड्याचे फुलं गोळा करण्याकरिता गेली असता वंदना अरविंद जेंगठे यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. दिभना परीसरात या घटने मुळे भीती चे वातावरण आहे. तसेच या परिसरात वाघाच्या हलल्याची सात दिवसात ही तीसरी घटना आहे.
सदर परिसरातील नागरिकांनी वाघाच्या बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकड़े केलेली आहे. पुढील तपास शुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here