गोसेखुर्द कॅनॉल मध्ये रानगवा : तीन तासांत केले रेस्क्यु : रेस्क्यु त्या धावपळीत नागरिकाना दुखापत

0
262

तळोधी (बा.): नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर परिसरातील गोसेखुर्द नहरात रानगवा पडल्याची घटना  दि. 18 जानेवारी 2024 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने त्वरित वनविभाग व स्बाब संस्थाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस रानगवा ओपन नहर मध्ये पडला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच हा रानगवा अंदाजे 12 ते 13 वर्षे वयाचा असून एक हजार किलो वजनाचा आहे.  नहरात पडलेल्या या रानगव्याला  बाहेर काढण्याकरिता सकाळी 9.00 वाजता पासुन रेस्क्यु मोहीम राबविण्यात आली. यावेळेस वनविभागाच्या सदस्यांनी नहरा मध्ये दोरीच्या साहाय्याने रानगव्याला उचलून शिंगामध्ये दोराचा फास टाकून दोराच्या सहाय्याने 3.00 तासानंतर सुखरुप बाहेर काढल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

(रानगव्याला बघण्यासाठी  होत असलेल्या गर्दी व धावपळमुळे एक इसम जखमी)
नहर मध्ये पडलेल्या रानगवाला वनविभाग, स्वाब संस्था, तथा ग्रामस्थांच्या सहकार्याने नहरा बाहेर काढण्यापूर्वी लोकांना गर्दी कमी करण्याचे विनंती करून देखील लोक आजूबाजूला उभे राहून फोटो व व्हिडिओ बनवित होते. रानगवाला बाहेर काढल्यानंतर दोराने बांधलेला रानगवा पिसाळलेल्या अवस्थेत झाला होता. त्यामुळे उपस्थित नागरिकांची धावपळ उडाली आणि या धावपळीत रानगवा आपल्यावर हल्ला करेल म्हणून ग्रामस्थ इकडे तिकडे पळू लागले व त्यात ज्ञानेश्वर पडोळे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली व तसेच तर काही अंतरावर ठेवलेल्या एका दुचाकीचे सुद्धा रानगव्याने नुकसान केले.
सदर घटनेत रानगव्याला  कोणतीही दुःखात न होता यशस्वीपणे बाहेर काढताना एस. बी.हजारे, सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी नागभिड, राकेश आहुजा बायोलाजीस्ट ब्रम्हपुरी, जी.एम. नवघरे, वनरक्षक जनकापुर, सी.एस. कुथे, वनरक्षक नागभीड,स्बाब संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, भोलेनाथ सुरपाम, महेश बोरकर, गणेश गुरनुले, शुभम निकेशर, व इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here