तालुक्यातील चालबर्डी (कोंढा ) शिव रस्त्या लगत वाघीणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
वाघीणीचा मृत्यू जिवंत विद्यूत तारांच्या स्पर्शाने झाल्याचे सूत्रांनी सांगिले होते. वन विभागाच्या तपास करणाऱ्या चमुला बरेच दिवस आरोपी हाती लागला नव्हता. अखेर वनविभागाच्या ताब्यात आरोपी लागला.
सदर प्रकरणात आरोपी कोंढा येथील शेतकरी तुकाराम वामन मत्ते वय ५३ वर्ष आहे. आरोपीने घटना स्थळापासून तब्बल दीड कि.मी. अंतरावर वाघिणीचा मृतदेह बैलबंडीने नेल्याचे वनविभागाच्या तपास दरम्यान पुढे आले आहे. पुरावे नष्ट करण्याचा उद्देशाने नेण्यात आले होते.
तुकाराम यांचे स्वतःच्या मालकीच्या शेतात शेतमालाच्या सुरक्षेसाठी कुंपणाला ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह नेहमी लावत होता. दिनांक ३ जानेवारी 2022 रोजी याच जिवंत विद्युत प्रवाहाची बळी 4 वर्षे असलेली वाघिण ठरली.
सदर घटनेची माहिती तुकाराम मत्ते यांना होताच त्यांनी हे प्रकरण लपविण्यासाठी शेतात मृत पावलेल्या वाघिणीला स्वतःच्या बैलबंडी वर शेतापासून दीड किमी अंतरावर चालबर्डी शिव रस्त्यावर आणून टाकले होते.
वन विभागाच्या चौकशी नंतर आरोपीला सोमवारला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाचा एफ सी आर मिळाला.
सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एच पी शेंडे, क्षेत्र सहाय्यक एन. व्ही. हनवते, वनरक्षक प्रशांत गेडाम यांनी केली आहे.
Home Breaking News आखेर वाघिणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी १५ दिवसानंतर वन विभागाच्या ताब्यात ; कुजलेल्या...