जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर): वनविकास महामंडळाचे कक्ष क्र. 172 मध्ये दिनांक 15 जून 2023 रोजी रघुनाथ नारायण गुरनुले राहणार नवेगाव लोन यांच्यावर FL-2 (नर) वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना उघडकीस आली होती.
तसेच FL-2 वाघाचे वास्तव्य सरडपार, नवेगाव लोन, चिटकी व जाटलापूर या मार्गावरील येणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याची बऱ्याच तक्रारी वनविभागाकडे आली असल्यामुळे FL-2 वाघाचे सनियंत्रण करण्याची कारवाई सुरू होती.
सदर परिसरातील रस्त्यावरील जाणारा वाहनांवर धावून हल्ला करण्याचे प्रवृत्ती बघून व तसेच भविष्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आज दिनांक 18 जुलै 2023 रोजी FL-2 नर वाघाला सिदेंवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सिदेंवाही मधील कक्ष क्र. 1281 मध्ये दुपारी 12.50 वाजताच्या सुमारास डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर तथा RRT प्रमुख अजय मराठे शूटर एवं RRT सदस्य यांनी FL-2 वाघाला डार्ट करून बेशुद्ध केले व त्याला दुपारी 1.30 च्या सुमारास पिंजऱ्यात बंद करण्यात आले.
सदर कारवाई एम. बी. चोपडे सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे.व वन्य) ब्रह्मपुरी, व्ही. ए. सालकर वनक्षेत्रपाल प्रादेशिक सिदेंवाही, वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे सदस्य ए.डी. कोरपे, ए.एम. दांडेकर, नूर सय्यद व राकेश अहुजा (फिल्ड बायोलॉजिस्ट ब्रह्मपुरी) यांचे उपस्थितीत पार पडले.
जेरबंद करण्यात आलेल्या FL-2 (नर ) वाघाचे वय अंदाजे तीन ते चार वर्षे असून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मान. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र नागपूर येथे हलविण्यात येत आहे.