ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जग प्रसिद्ध असल्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची पावले ताडोबाकड़े आपोआप वळतात .पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे दिनांक 15 मार्च सोमवारी रोजी ताडोबात मुक्कामी आले ते मुंबईहून नागपूर आले तिथून थेट चिमूर मार्गे ताडोबात गेले दौरा गुप्त असल्यामुळे त्याची माहिती कुठेही नोंद नाही दौरा शासकीय नसल्यामुळे कोणत्याही अधिकारी किंवा पक्ष कार्यकर्ते यांना माहिती देण्यात आलेली नाही अतिशय गुप्त पद्धतीने हा दौरा करून दिनांक 17 मार्च बुधवारी रोजी ते परत गेले. पूर्णपणे गुप्तता बाळगलेल्या दौऱ्याची भाजपा आमदार नितेश राणेंच्या ट्विट नंतर सर्वांना माहिती झाली.
ताडोबाचा निसर्गाचा त्यांनी भरपूर आनंद घेतला ताडोबा कोर व बफरची सफारी केली व त्यांना व्याघ्रदर्शन देखील झाले अशी माहिती सूत्रांनी दिली. मोहर्ली पासून काही किलोमीटर च्या अंतरावर असलेल्या एका खाजगी रिसोर्टवर थांबले होते. ताडोबा प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकल्पा विषयीचे सादरीकरण केले.
ताडोबा मध्ये वन आणि वन्यजीव संवर्धनाचे कार्य उत्तम असल्याचे मत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.