16 वर्षीय राज ला बिबट्याने केले ठार

0
1150

चंद्रपूर:
दुर्गापुर परिसरातील CTPS ची घटना ताजी असताना त्याच परिसरात आणखी एक छोट्या मुलाची घटना उघडकीस आल्याने जनतेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच राजकीय पक्षांनी देखील चंद्रपूर महा औद्योगिक केंद्र व  वनविभागावर ताशेरे ओढले.
सदर घटना दुर्गापूर येथील नेरी मध्ये राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना दि.17 फरवरी 2022 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडलेली आहे.
राज दुर्गापूर ग्रामपंचायतच्या मागे जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व त्याला उचलून नेले.


सदर घटनेची माहिती दुर्गापूर पोलिस व वनविभागाला होताच शोध मोहीम सुरू केली असता WCL डोजर गॅरेज जवळ राज चे शव प्राप्त झाले असून त्याचा पंचनामा करून  शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सदर घटनेचे शोध मोहीम मध्ये दुर्गापूर पोलिस स्टेशनचे स्वप्नील धुळे PI, प्रवीण सोनोने PSI , प्रवीण लाकडे PSI,  हेड कॉन्स्टेबल अशोक मंजुळकर,  हेड कॉन्स्टेबल  प्रभाकर चव्हाण, खुशाल खेडेकर,  जयसिंग जाधव,  दिलीप इंगळे, रवींद्र धूर्वे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here