
मुंबई : संजय गांधी नॅशनल पार्क (SGNP)च्या अधिकाऱ्यांनी व NGO वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी (WCS) सोबत मिळून क्रांती नामक मादी बिबट्याला रेडिओ कॉलर लावून तिला पुन्हा नैसर्गिकरित्या सोडण्यात आले आहे.
संजय गांधी नॅशनल पार्क चे संचालक आणि वनसंरक्षक मल्लिकार्जुन म्हणाले, “आमच्या बिबट्याच्या रेडिओ कॉलरिंगच्या कामात सातत्य ठेवत, शुक्रवारी आम्ही क्रांती नावाच्या एका सहा वर्षांच्या मादी बिबट्याला यशस्वीरित्या रेडिओ कॉलर करून सोडण्यात आले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या सरावामुळे बिबट्या शहरी भागात कशा प्रकारे संचार करतात याची माहिती मिळेल.
(WCS) वन्यजीव संवर्धन सोसायटीचे संचालक आणि जीवशास्त्रज्ञ डॉ. विद्या अत्रेय आणि जीवशास्त्रज्ञ निखिल सुर्वे आणि त्यांची टीम व पशुवैद्यकीय डॉ. निखिल बांगर आणि डॉ. रश्मी गोखले कॉलरिंग प्रक्रिये दरम्यान उपस्थित होती.
तसेच पुढील दिवसांत आणखी दोन बिबट्यांवर असाच सराव केला जाईल.
