शेतात दबा धरून बसलेला वाघाने शेतकरीला केले ठार; शरीराचे अवयव मिळाले वेगवेगळ्या शेतात

0
813

 

चिमूर :
चिमूर वरोरा मार्गावर पावर प्लांट जवळ असलेल्या शेतात वाढलेला तण (गवत) काढण्यास गेलेला शेतकरीवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने ठार केल्याची घटना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव देविदास महादेव गायकवाड वय 40 वर्ष राहणार सोनेगाव बेगडे, चिमूर आहे. शहरापासून ३ कि.मी. अंतरावर असलेला सोनेगाव बिगडे हे छोटेसे गाव आहे. मृतक देविदास हा येथील रहिवासी होता. आपल्या शेताची देखरेख करण्यास तो रोज शेतात जात होता शेतातील ६ ते ७ फूट उंच पिकात दबा धरून बसलेल्या वाघाने शिकार करण्याच्या उद्देशाने तिथे होता. पहाटेच्या सुमारास शेतकरी देविदास गवत कापण्याचे गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.सायंकाळी घरी परत न आल्याने रात्रीच्या वेळेस चिंतेत असलेलीं म्हातारी आई आणि भाऊ आपल्या काही नातेवाईकांसोबत शेतात शोधण्यास गेले पण रात्रीची वेळ असल्याने शोध लागली नाही. परत दुसऱ्या दिवशी शोध घेतल्यास देविदासला वाघाने ठार केल्याची व शरीराचे अवयव डोके, हात, पाय व धडापासून वेगळे करून दोन वेग वेगळ्या शेतात मिळाले.याची माहिती पोलीस स्टेशन चिमूर येथे देण्यात आली.
आज सकाळी नातेवाईक व ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबविली शेतातील उंच पिकामध्ये पाहणी केली असता मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. त्याच्या शेतात शरीराचे काही अव्याय तर दुसऱ्याच्या दोन शेतात धडापासून वेगळे केलेले मिळाले आहे. सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोके हात पाय धड वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले व उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले.
सदर घटनेची पाहणी वनविभागाने केली असता वाघाच्या पायाचे पगमार्ग (ठसे) आढळून आले.
यापरिसरातील ग्रामस्थांनी वाघाच्या बंदोबस करण्याची मागणी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here