चंद्रपूर चे ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्यास पर्यावरण मंत्री ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनास सूचना

0
271

मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि. 14 ऑक्टोम्बर 2021 गुरुवार रोज बैठकीत पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चंद्रपूरच्या ऐतिहासिक गोंड काळातील रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करण्यास आणि पर्यटन विकासासाठी खोलीकरण आणि स्वच्छतेची कामे जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, आयुक्त राजेश मोहिते आणि संबंधित अधिकारी चंद्रपूरहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते.

यावेळी रामाळा तलाव खोलीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तसेच तलावातील प्रदूषित सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे दिल्या.
पर्यावरण विभागाने सुरू केलेला माझा वसुंधरा अभियान पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि ते निश्चितच बळकट होईल असे बंडू धोतरे म्हणाले.

सदर बैठकीत प्रधान सचिव, पर्यावरण विभाग मनीषा म्हैसकर, महेश पाठक, मिलन बोरीकर, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ विभागीय व्यवस्थापक अशोक शिंगाले, सदस्य सचिव डॉ.व्ही.एम. मोटघरें, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक आणि इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here