भद्रावती:
भद्रावती येथील गौतम नगर येथे जूनघरे यांच्या शेतात काम करीत असलेल्या महिलांना सकाळी 10.00 वाजताच्या सुमारास एक मोठा साप शेतात आढळल्या ने सर्वत्र खळबळ उडाली. त्यांनी लगेच नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थे चे विभाग उपाध्यक्ष सर्पमित्र श्रीपाद बाकरे यांना माहिती दिली.माहिती मिळताच घटनास्थळी सर्पमित्र श्रीपाद बाकरे , अनुप येरणे, शैलेश पारेकर, गोलू देरकर दाखल झाले व त्यांनी त्या मोठया अजगर सापाला रीतसर पकडून व त्याची वनविभागात नोंद करून वनपरिक्षत्र अधिकारी शेंडे यांच्या मार्गदर्शनात कोणाला ही इजा न होता त्याला योग्य ठिकाणी सोडण्यात आले.
सदर घटनास्थळी वनविभागाचे मदतनीस म्हणून शेत मजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.
“अजगर साप पकडताना एक गंभीर बाब लक्षात आली ती म्हणजे ग्रामीण भागातील गरीब महिला मजुरी करण्याकरिता शेतात येतात तेव्हा अचानक शेतात विषारी साप निघाला तर शेत मजुरांचा जीव धोक्यात येऊ शकतो”.
…….या संदर्भात राज्य शासनाने वन्यजीव अधिनियम कायद्यात शेतात साप चावून दगावले असता त्यांचा परिवाराला आर्थिक मदत म्हणून किमान 5 लाखाची तरतूद करावी असे नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थेचे विभाग उपाध्यक्ष सर्पमित्र श्रीपाद बाकरे यांनी वन समाचारच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना म्हटले.