गड़चिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरातील बिबट्याचे कातडे (चामडे) विक्री करणाऱ्या टोळीस अटक

0
530

 

गडचिरोल्ली जिल्हा प्रतिनिधी / रामु मादेशी..

दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी आरमोरी परिक्षेत्रातील आरमोरी शहरात मृत बिबट वन्य प्राण्यांची कातडी(चामडी) विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवले असल्याची गुप्त माहिती मिळाली.

सदर माहितीच्या आधारे वन विभागाद्वारे तोतया ग्राहक तयार करून विक्रीत सहभागी असलेल्या यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकाते, विश्राम शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे, ईश्वर सोरते सर्व राहणार आरमोरी एकूण 5 आरोपींना अटक केली ,मृत बिबट चामडे व नखे हस्तगत करून ताब्यात घेण्यात आले.सदर आरोपी यांना मा.न्यायदंडाधिकारी ,प्रथम श्रेणी न्यायालय आरमोरी यांनी सदर आरोपींना दिनांक 19 /4 /2021 पर्यंत वन कोठडी (FCR)सुनावले आहे यामध्ये इतर आरोपी असल्याची शक्यता असल्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे, सदर कार्यवाही ही श्री. निरंजन विवरेकर उपवनसंरक्षक ,वडसा वन विभाग वडसा ,तसेच श्री.मनोज चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एस. एम. डोंगरवार वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी, श्री.आर.बी.इनवते,वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव वडसा, श्री आर.पी. कुंभारे क्षेत्रसहाय्यक आरमोरी ,श्री. एस .पी .तिजारे वनरक्षक, श्री वनरक्षक श्री बी.एन. शेंडे, श्री एन. एम.तुमपल्लीवर, के.एस.गिणनलवर, वन रक्षक, कुमारी आर.बी सहारे वनरक्षक, कुमारी पी.एच करकडे वनरक्षक, श्रीकांत सेलोटे वनरक्षक ,श्री कानकाटे वनरक्षक तसेच आरमोरी परिक्षेत्रातील कर्मचारी यांनी केले .पुढील तपास श्री.एस. एम.डोंगरवार वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here