गस्तीवर असलेल्या वन कर्मचारी वृंद यांना केले फळं वाटप. व वाघाच्या हल्ल्याचा घटना झालेल्या गांवात जाऊन मार्गदर्शन केले व जंगलात मोहफुल गोळा करायला प्रवेश करु नये अशी विनंती केली.
तळोधी (बा) यश कायरकर :
मानव व वन्यजीव (वाघ) संघर्ष सुरू असलेल्या जंगलात वाघाच्या हल्ल्याचा घटना पुन्हा घडू नये, म्हणून तळोधी वनविभागाने दिवस रात्र गस्त सुरू केली आहे. आणि संशयीत वाघा वर कॅमेरा ट्रॅप द्वारे बारीक लक्ष ठेवले जात आहे.
ज्यात तलोधी बा. वनपरीक्षेत्र अधिकारी के.आर.धोंडाणे, व्ही.जी. पिडुलवार क्षेत्र सहाय्यक गोविंदपूर बीट, एस.एस. गौरकर वनरक्षक येनुली, जुमनाके मॅडम वनरक्षक सारंगढ बिट, यू.बी. कर्हाडे वनरक्षक कच्चेपार बिट, एस.एन. प्रधान वनरक्षक गिरगाव बीट, ओ.पी. चहांदे वनरक्षक गोविंदपूर बीट, गस्तीवर असलेल्या वनकर्मचारी व वनमजुरांना भेटुन आज स्वाब नेचर केअर संस्था’ तर्फे फळें पोहोचवली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत गस्त केली व त्यानंतर सायंकाळी वाघाच्या हल्ल्याचा घटना झालेल्या त्या परिसरातील गांवात जाऊन मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मार्गदर्शन केले व जंगलात मोहफुल गोळा करायला प्रवेश करु नये अशी विनंती केली.