घोषित झालेले कान्हारगाव अभयारण्य रद्द करण्यासाठी झरण ता. गोंडपीपरी येथे कोठारी –गोंडपीपरी ह्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 335 (ब) कान्हारगाव अभयारण्य विरोधी संघर्ष समिती द्वारे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राजू झोड, पांडुरंग जाधव बाबुराव मडावी, जगन्नाथ एलके ,धीरज बांबोडे,प्रदीप कुलमेथे, राजेश्वर डोडीवार यांनी केले.
4 डिसेंबर 2020 ला शासनाने कन्हारगाव अभयारण्य घोषित केले.अभयारण्याच्या प्रस्तावास स्थानिक गावकर्यांनी आधीच विरोध दर्शविला होता.या परिसरातील 47 गावांनी ग्राम पंचायतीचा ठराव करून अभयारण्य न करण्याची विनंती केली होती. वेळोवेळी आंदोलन,धरणे आंदोलनगावकर्यांचा विरोध झुगारून अभयारण्य घोषित केले.त्यामुळे गावकऱ्यांचे आठ महिन्याचे काम हातून जाणार असून स्थानिकाचे रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या अभयारण्यात बहुनताश वनक्षेत्र FDCM चे येत असून यावर अवलंबून असणाऱ्या 30,000 मजुरांचा रोजगार हिरावला जाणार आहे.जंगल शेजारी येणारी शेती ,शेतकरी यांना मानव-वन्य जीवाचा संघर्ष करावा लागणार आहे.कान्हारंगाव अभयारण्याच्या क्षेत्रातील 47 गावे बाधित होणार आहेत. या अभयारण्यात 269 चौ.हेक्टर क्षेत्र संरक्षित व बाधित होत असल्याने क्षेत्रातील शेतकरी ,मजूर जंगल कामगार व जंगलातून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून असलेल्या लोकांचा रोजगार संपुष्टात येणार आहे.तसेच जंगलात वाढणार पर्यटकांचा ओघ आणि वर्दळ यामुळे वन्य प्राणी क्षेत्र सोडून शेती तथा गावाकडे भ्रमंती करतील.
प्रस्तावित अभयारण्यात गोंडपीपरी तालुक्यातील 39, बल्लारपूर तालुक्यातील 3, पोंभुरणा तालुक्यातील 5 असे 47 गावे येत असून ह्या गावाची लोकसंख्या 42144असून त्यापैकी निम्मंपेक्षा जास्त लोक जंगली कामावर अवलंबून असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर समस्या उद्भभवणार आहे.ह्या बाबी शासनाने लक्षात घेऊन घोषित अभयारण्य रद्द करून स्थानिक लोकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवावा,पेसा कायदा लागू करावा,मानव– वन्य जीव संघर्ष टाळण्यासाठी नियोजन करावे. व वनग्राम मुक्ती ग्राम दर्जा द्यावा यासाठी झरण येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उलगुलान कामगार सेना चे पदाधिकारी व परिसरातील हजारो महिला,पुरुष,कामगार,मजूर व जनता रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले.पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी आर.एस.पवार,कोठारी ठाणेदार तुषार चौहान, धाबा ठाणेदार सुनील धोपटे ,चंद्रपूर दंगा नियंत्रण पथक, पोलीस ताफा उपस्थित होत.
” जल,जंगल,वनसंपदा,वन्य प्राणी यांचेशी स्थानिक जनता व आदिवासी यांचे घनिष्ट व सलोख्याचे संबंध असून त्यांच्या रक्षणाची येथील प्राणी ,वनसंपदा सुरक्षित आहे.ताडोबा अभयारण्य सारखे मानव व प्राणी संघर्ष होऊ नये .कन्हारगाव घोषित अभयारण्य रद्द न झाल्यास विधान भवनांवर मोर्चा करून आंदोलन करण्यात येईल.शासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला समोर जावे लागेल.तरुणांना काम,उद्योग ,पोटाची भाकर ची व्यवस्था आधी करावी नंतरच जनतेच्या विश्वासाने निर्णय घ्यावा.
. *राजू झोडे स.अध्यक्ष उलगुलां कामगार संघटना*
” कन्हारगाव अभयारण्य रद्द करण्यासाठी झरण येथे रस्ता रोको करण्यात आला.जनतेच्या भावना,मागणी शासनाकडे पाठविणार आहे.त्यावर शासन निर्णय घेईल.
*के. डी. मेश्राम तहसीलदार ,गोंडपीपरी*
जंगलातील आदिवासी यांचा हक्क जंगल, जमीन, पाणी व वन्य प्राण्यावर असून त्याचे रक्षणाची जबाबदारी स्थानिकांची आहे.आमी अभयारण्य होऊ देणार नाही व उपाशी मरणार नाही. इथे उद्योग नाही तेव्हा काम कुठे करून पोट भरायचे.या अभयारण्याला तीव्र विरोध आहे.
*प्रदीप कुलमेथे अध्यक्ष कन्हारगाव अभयारण्य संघर्ष समिती* *मोर्चेकर्यांनी दिला अंबुलनसल रस्ता*
जनतेचा रस्ता आंदोलन सुरू असताना गोंडपीपरी कडून रुग्णाला घेऊन एमबुलन्स आली असता मोर्चेकर्यांनी शांततेत रस्ता मोकळा करून दिला व पुन्हा रस्त्यावर येऊन आंदोलन केले .