पिंपळगाव मध्ये सांबराची शिकार,11 आरोपींना अटक : शंकरपूर वनविभागाची मोठी कारवाई

0
1700

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :

चिमुर वनपरिक्षेत्र अंतर्गत नव्या बिटातील, पिंपळगाव येथे सांभर ची  शिकार करून मास विक्री करण्याकरिता आणणाऱ्या 11 आरोपींना आज दिनांक 17 जानेवारी 2022 रोज दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली.
सदर कारवाही ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया'(WPSI) च्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेली आहे.  पिंपळगाव व नवतळा बिट येथील जंगला लगत असलेल्या जंगल परिसरातील  मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने सांभराची शिकार करुन मास गावात आणून विक्री करण्याचा बेत होता.


याबाबतची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया( WPSI) व तरुण पर्यावरणवादी मित्र शंकरपूर यांना  मिळतात त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली.
त्या माहितीनुसार  नवतळा येथील शंकर मेश्राम यांच्या घरी धाड मारली असता सांबरची भाजी शिजत होती ती भाजी जप्त करून त्याला बोलते केले असता शिकार करणारे मुख्य आरोपी हे  पिंपळगाव येथील असल्याने त्यांच्या घरी धाड मारली  त्या धाळीत ३ तीन किलो शिजविले मास , ३ तीन किलो कच्च्या मास, चामडे डोकं पाय, व शिकारी करिता वापरण्यात आलेले सत्तुर,  कुराड, विळा, आदी साहित्य जप्त करण्यात आले.
सदर प्रकणात पिंपळगाव येथील अरविंद तुकाराम ननावरे, निखिल महादेव जीवतोडे, अवचित सुभाष बारेकर, राजू घुघुसकर ,रुपेश धारणे ,एकनाथ बारेकर ,सुरज हरी घरत ,अभिषेक चंद्रभान नन्नावरे तर नवतळा येथील शंकर मसराम, राजू वाढई ,रामू राजेराम कुमरे यांना ताब्यात घेतले असून  वन विभागाची कारवाईची  सुरू आहे.
वृत्त लिहेपर्यंत ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक अधिकारी यु. बी. लोखंडे, नैताम वनरक्षक, सोनुले प्रदीप ढोणे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here