कळमटोला परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी

0
292

 

गडचिरोली / रामु मादेशी

अमिर्झा :
दिभना ते अमिर्झा या मार्गावरील अमिर्झा पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेले कळमटोला येथील जंगल परिसरलागत असलेले शेतशिवारात वाघाने महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना 16 जानेवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली जख्मी महिलेचे नाव सुनंदा वसंतराव भोयर वय 45 आहे.
प्राप्त माहितीनुसार सुनंदा भोयर ही कळमटोला गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतशिवारात कामासाठी गेली होती शेतात काम करत असताना सुनंदा भोयर यांच्यावर वाघाने अचानक झेप घेतली तिचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला. सुदैवाने सदर महिलाही गंभीर जख्मी झाली असून तिला उपचारासाठी तात्काळ गडचिरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहेत यादरम्यान जिल्ह्यात मानवावर वाघाचा हल्ल्याचा घटनाक्रम सुरू असल्याचे दिसत आहे.
मागील महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात मुख्यालय पासून काही अंतरावर असलेले चांदाळा जंगल परिसरात व गुमाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना घडलेली आहे तसेच अमिर्झा परिसरात वाघाची दहशत कायम असून अनेक नागरिकांना प्रवास करताना वाघाचे दर्शन झाले आहे त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. तरी वनविभागा तर्फे वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here