भंडारा जिल्ह्यात रेल्वे अपघातात वाघिणीला गंभीर दुखापत; तातडीने बचाव मोहिमेत रेस्क्यू करून गोरेवाडा वन्यजीव चिकित्सालयात उपचार सुरू

0
54

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :

दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5:30 वाजता भंडारा वन विभागाअंतर्गत नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र डोंगरी येथील  रेल्वे फाटक जवळ वाघ (मादी) रेल्वे अपघातामध्ये गंभीर जखमी झाली असल्याची माहिती मिळाली असता भंडारा वन विभागातील वनकर्मचारी, वनअधिकारी,पोलीस व रेल्वे प्रशासन कर्मचारी तसेच वन्यप्राणी बचाव दल, भंडारा व नवेगाव – नागझिराचे यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तसेच डॉ.एल के बारापात्रे, पशुवैद्यकीय अधिकारी, नाकाडोंगरी, डॉ.आशिष गटकल, पशुधन विकास अधिकारी, शिहोरा,डॉ. विठ्ठल हटवार, पशुधन विकास अधिकारी, कनेरी, डॉ. मेघराज तुलावी,पशुधन विकास अधिकारी,  नवेगाव नागझिरा व मा. राहुल गवई,  उपवनसंरक्षक, भंडारा हे सुद्धा घटनास्थळी हजर झाले.


त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या प्रमाणभूत कार्यप्रणालीनुसार माजी मानद वन्यजीव रक्षक, शाहिद खान व NTCA चे प्रतिनिधी जुडे पिचर,  सदस्य, SEAT स्वयंसेवी संस्था,  भंडारा व पशुधन विकास अधिकारी यांचे चमू यांची समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर समिति व वैद्यकीय सल्ल्यानुसार वन्यप्राणी वाघ यास बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. जखमी वन्यप्राण्याचे शारीरिक तपासणी व औषध उपचार डॉक्टरांच्या चमूद्वारे करण्यात आले व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर वन्यप्राणी गंभीर दुखापत असल्याने पुढील औषधोपचार आवश्यक असल्याने वन्यप्राणी वाघ वैद्यकीय तपासा  व औषधोपचाराकरिता गोरेवाडा वन्यजीव चिकित्सालय, नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले असून जखमी वाघावर औषध उपचार सुरू आहे
सदर वन्यप्राणी वाघ रेस्क्यूची कारवाई   राहुल गवई, मा. उपवनसंरक्षक,  भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली  रितेश भोंगडे, प्रकाष्ट निष्कसण अधिकारी, गडेगाव  व  कु. अपेक्षा शेंडे, परिक्षेत्र वन अधिकारी, जाबकांद्री व वन कर्मचारी भंडारा वनविभाग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here