वाघाच्या कातडीची तस्करी करणारे पाच जणांना अटक

0
583

गोंडपिपरी चा मुख्य मार्गावर वाघाच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाच्या दक्षता पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आले वन विभागाच्या दक्षता पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने वाघाची कातडी आणत असल्याचे माहितीच्या आधारे सायंकाळी स्थानिक रोहित बार समोर दुचाकीवर दोघे संशयास्पद स्थितीत दिसल्याने तपास केल्यास त्यांना अटक करण्यात आली.
तपास दरम्यान या प्रकरणात आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार सर्व आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भामरागड परिसरातील असल्याची आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे उपवनसंरक्षक मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गादेवार यांनी आरोपीची चौकशी केली असता आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार मिळालेले नसल्याने आरोपीचे नावाबाबत गुप्तता बाळगली जात आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here