तळोधी (बा.) :
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रातील हुमा बिटातील मौजा चिंधी माल जवळील नागभीड – चंद्रपूर हायवे रोडवर पहाटे साडे चार ते पाच वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन नर चितळाचा मृत्यू झाले असून एका चितळाचे वय अंदाजे दोन वर्षे तर दुसरा चितळाचे वय चार वर्ष असे दोन्ही नर चितळ हे गंभीर जखमी झाले व जवळील शेतात जाऊन रोडच्या बाजूला तर एक अंदाजे 70 मीटर अंतरावर खासगी शेतात जाऊन मृत आढळून आले.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच एस. बी. हजारे सहाय्यक वनसंरक्षक ब्रह्मपुरी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड आपल्या टीम सोबत व तसेच स्वाब नेचर केअर संस्थेचे सदस्य घटनास्थळी उपस्थित झाले. सदर जख्मी अवस्थेत असलेले दोन्ही चितळ हे काही वेळातंच मृत पावले.सदर घटनास्थळी मौका पंचनामा करून मृत दोन्ही चितळाला जंगलामध्ये नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. यावेळेस शवविच्छेदन नागभीडच्या पशुचिकित्सक डॉ. कुमारी ममता वानखेडे यांनी केले. यावेळेस ए.के. नेरलावार क्षेत्र सहाय्यक नागभीड, एस. एस. कुळमेथे वनरक्षक हुमा बीट, सि.एस. कुथे वनरक्षक नागभीड, यश कायरकर अध्यक्ष स्वाब संस्था, जिवेश सयाम, महेश बोरकर, गणेश गुरनुले, विकास लोणबले, अमन करकाडे हे स्वाब संस्थेचे सदस्य, तथा वन मजूर आदि उपस्थित होते.
अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक व संरक्षक एस. बी. हजारे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.