भोपाळ-जबलपूर महामार्गावर वाहनाच्या धडकेत युवा वाघिण मृतावस्थेत

0
92

(ही घटना बिनेका परिसरात (ओबेदुल्लागंज) – रातापानी वन्यजीव अभयारण्याजवळ घडली, ज्याचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी केले होते.)

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :
मध्यप्रदेश च्या राजधानी भोपाळ पासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोपाळ-जबलपूर चौपदरी रस्त्यावर शुक्रवारी रात्री उशिरा एक युवा मादा वाघिण मृतावस्थेत आढळून आली.
रातापाणी परिसरात सुमारे 54 वाघांचे वास्तव्य आहे, परंतु अलिकडच्या वर्षांत अनेक शिकारीचे प्रयत्न किंवा ट्रॅकवरील अपघातांना बळी पडले आहेत.
अलीकडे, रतापाणी वाघाला शिकार्यांनी जवळून गोळ्या घालून ठार मारल्याची घटना उघडकीस आली होती.
अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (एपीसीसीएफ) एल. कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात वाहनाने वाघाला धडक दिली. “आमच्या गस्ती पथकाला वाघ सापडला, जो घटनास्थळीच मृत झाला होता. आम्ही आता जवळच्या टोल बूथवरील सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन करत आहोत दोन्ही पहलूंनी तपासणी सुरु असून जेणेकरून त्या अध्यात वाहनाबाबत कोणतेही संकेत मिळू शकतील,” असे अधिकारी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here