भेकर व चौसिंगा वन्यप्राणीची सातारा येथे शिकार

0
484

आसाम रायफल मिलिटरी मधील रायफल मॅन युवराज निमन यांना व इतर दोन जणांना अटक

दि.14 नोव्हेंबर 2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व इतर वनपाल  व वनरक्षक , पंच असे सर्वांनी मिळून माची पेठ येथे असलेल्या  श्री वास्तू अपार्टमेंट मध्ये असलेल्या A4 सदनिका मध्ये रहात असलेल्या युवराज निमन  यांच्या राहत्या घरी छापा मारले असता त्यांच्या राहत्या घरात भेकर, व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राण्याचे मुंडके व भेकराचे ताजे मटण व पायाचे खुर सापडले आहे
चौकशी दरम्यान युवराज निमन यांच्या माहितीनुसार ठोसेघर येथील  नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर यांच्या सोबत मिळून  शिकार केली आहे.


तसेच नारायण यांच्याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी साधारण 7.30 वाजताच्या सुमारास  भेकर याची शिकार बंदुकीने केली , व भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याचा मटणाचे वाटे केले व त्यापैकी एका भेकराचे मुंडके  व  थोडे मटण हे युवराज निमन याला सकाळी 14 नोव्हेंबर 2022 रोजी दिले, कातडे सोलून ओढ्यात लपविण्यात आले व उरलेले मटण पैकी थोडे मटणाचा वाटा विठ्ठल बेडेकरला दिला तर उर्वरित सर्व मटण हे नारायण यांनी स्वतःच्या घरी घेऊन  गेले आहे.
नारायण ह्यांनी सर्व मटण स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून सदर पिशवी घरामागील खोलीत शेणीच्या खाली लपवून ठेवले होते. सदर मटण हे सातारा मध्ये कोणा बड्याहस्तीला देण्यासाठी लपवून ठेवले होते, व ते मटण हे रात्री घेऊन जाणार असल्याचे  नारायण यांनी चौकाशी दरम्यान सांगितले आहे.
सदर घटनेतील तीन आरोपीना वन विभागाने शिताफीने सातारा व ठोसेघर येथे अटक करण्यात आली.


सर्व मुद्देमाल दोन बंदूका एक एअर गण व एक सिंगल बोअर बंदूक व जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचे चाकू , कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मटण व कातडे हे सर्व घटनास्थळी दाखविण्यात आले आहे, सर्व गोष्टी वनविभागाने पंचा समोर जप्त केल्या आहे.
सदर घटनेतील आरोपीना अटक करण्यात आले असून त्याच्यावर वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिकारी हे सराईत शिकारी आहेत व त्यांनी ह्या पूर्वी असे  वेग वेगळे गुन्हे केलेले आहेत.त्याचे पुरावे वनविभागास मिळाले आहेत. पुढील चौकशी सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले हे करीत आहेत.

उप वनसंरक्षक सातारा महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व वनपाल दीपक गायकवाड, खुशाल पावरा, व वनरक्षक विक्रम निकम, राज मोसलगी, अशोक मलप , मारुती माने, साधना राठोड, अश्विनी नरळे , पंच , पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर , सुहास पवार चालक सुरेश गबाले ,दिनेश नेहेरकर , पवन शिरतोडे या सर्वांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here