चंद्रपूर येथे स्वच्छता ग्रीन लिफ समितीची सभा सम्पन्न : पर्यटन स्थळांच्या स्वयं मुल्यांकन अहवाल सादर करण्याचे निर्देश

0
215

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग)
१४ ऑगस्ट २०२४ रोजी, जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि जिल्हास्तरीय अध्यक्ष स्वच्छता ग्रीन लिफ समिती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वच्छता ग्रीन समितीची सभा विस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी परिसर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली.


सदर सभेस श्री. विनय गौडा, अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती, स्वच्छता ग्रीन लिफ समिती चंद्रपूर तथा जिल्हाधिकारी, श्री. विवेक जॉनसन, चंद्रपूर उपाध्यक्ष जिल्हास्तरीय समिती, स्वच्छता ग्रीन लिफ समिती चंद्रपूर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती नुतन व्ही. जि.प. चंद्रपूर सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, स्वच्छता ग्रीन लिफ समिती चंद्रपूर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सावंत (पा.व.स्व.) जि. प. चंद्रपूर, स्वच्छता ग्रीन लिफ समिती चंद्रपूर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),श्रीमती मीना साळुंखे जि. प. चंद्रपूर सदस्य जिल्हास्तरीय समिती, स्वच्छता ग्रीन लिफ समिती चंद्रपूर, तथा श्री. संजय ढिमोले उपाध्यक्ष रिसोर्ट युनियन चंद्रपूर आदि सर्व मान्यवर सभेस उपस्थित होते.
सदर सभेची सुरुवात मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व.स्व.) जि.प. चंद्रपूर यांनी सदर सभेच्या आयोजनाची पार्श्वभुमी तसेच स्वच्छता ग्रीन लिफ समितीची संकल्पना व केंद्र व राज्य शासना कडील प्राप्त मार्गदर्शन सुचना बाबत तसेच सदर अभियान राबविणेच्या अनुषंगाने जिल्ह्यात पर्यटनाला वाव देवून स्वच्छते संदर्भात केंद्र शासनाच्या उद्देशाबाबत प्राप्त सुचना बाबत माहिती समिती समोर सादर करण्यात आली.
तसेच सदर समितीच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती गठन करण्याबाबतची माहिती सादर केली व सदर तालुकास्तरीय गठीत करण्यात आलेल्या समिती मार्फत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात असलेले रिसोर्ट, लॉज, हॉटेल्स, होमस्टे, पर्यटन स्थळ इत्यादीची केंद्र शासनाकडील प्राप्त नमुन्यात स्वयं मुल्यांकन अहवाल सादर करण्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेला दिलेल्या सुचनेबाबत समिती समोर माहिती दिली आहे.
तसेच सदर स्वयं मुल्यांकन अहवाल संबंधित आस्थापनेकडून माहिती भरुन सदर माहितीचे तालुकास्तरीय समिती समोर अहवाल सादर करणेबाबत. तसेच सदर अहवालाबाबत तालुकास्तरीय समिती पुनःश्च तपासणी करुन गुणांकन करुन ते जिल्हास्तरीय समितीकडे सादर करणार आहे.
सदर जिल्हास्तरीय समिती त्या अहवालाच्या अनुषंगाने तपासणी करेल आणि तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी व आवश्यक सुधारणा करून गुणानुक्रमे पहिले, तिसरे, आणि पाचवे मुल्यांकन याबाबत आवश्यक कार्यवाही करेल.
त्याअनुषंगाने, मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी तालुक्याच्या वतीने प्राप्त यादीची पुनरावलोकन करून या अभियानात कोणतेही रिसोर्ट, लॉज, हॉटेल्स, होमस्टे किंवा पर्यटन स्थळ वंचित राहणार नाही, याची खात्री करण्यासाठी माहिती तपासून सुधारित यादी तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.
रिसोर्ट युनियनच्या उपाध्यक्षांनी या अभियानाअंतर्गत सर्व रिसोर्ट, लॉज, हॉटेल्स, होमस्टे आणि पर्यटन स्थळांना स्वच्छता ग्रीन लिफ संदर्भातील माहिती देऊन त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय सभा ताडोबा टायगर वॅली रिसोर्ट, मोहर्ली येथे आयोजित करण्याची सूचना दिली आहे. त्याअनुषंगाने, मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी ग्रीन लिफ रेटिंगबाबत आवश्यक जनजागृती करण्यासाठी आणि योजनेच्या उद्दीष्टपूर्ततेसाठी प्रशिक्षण आयोजित करून सर्वांचा सहभाग घेण्याच्या सूचनाही दिल्या. स्वयं मुल्यांकन अहवाल आणि इतर आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here