चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सर्वोत्तम ठिकाण बनविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केली. त्यासाठी लागणारा निधी टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार असे ही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते मंत्रिमंडळाच्या बैठकित ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढविण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि राज्याचे वनमंत्री दत्तात्रेय भरने मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यटन विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा विचार केला पाहिजे.
ताडोबा बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपण वितरीत केले जाईल ज्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यास आणि मानवी वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
ताडोबा भवनाच्या बांधकामाला मंजुरी
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पा जवळील तीन कार्यालये एकाच छता खाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली असून त्या इमारतीच्या बांधकामासाठी लागणार 18 कोटी रु. खर्च येणार आहे.
तसेच या आर्थिक वर्षात 3 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले असून, उर्वरित निधीची तरतूद पुढील महिन्याच्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.
तसेच बैठकीत पुनर्वसन होणाऱ्या रानतलोधी आणि कोळसा या गावांवर ही चर्चा करण्यात आली व तसेच कारवां गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, त्यासाठी 70 कोटी रुपये लागणार आहेत. असे ही बैठकीत सांगण्यात आले.