चिमूर वनपरिक्षेत्रातील खानगाव येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व
स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व चिमूर तालुक्यातील खानगाव येथील आपल्या शेतात जागली म्हणजे रात्री झोपण्याकरिता गेलेल्या इसमाला शौचास लागल्यानंतर शेत परीसरातील नाल्याच्या काठावर अंधारात शौचास जाऊन बसणे जीवावर बेतले, वाघाणे अंधारात शौचास बसलेला मानव की वन्यजीव ? असा अंदाज न बांधता आल्यामुळे हमला करून आज दि.15 मे 2024 रोज वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे आहे की, खानगाव येथील मृतक अंकुश श्रावण खोब्रागडे वय 34 वर्ष या व्यक्तीला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. स्थनिकाच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक आपल्या शेतामध्ये रात्री जागली करण्यासाठी झोपण्यास जात होता. कल दि. 14 मे 2024 रोजी रात्री नेहमी प्रमाणे जेवण करून झोपण्यासाठी स्वतःच्या शेतात गेले असता मध्यरात्री शौच करण्यास शेती लगत असलेल्या नाल्याच्या काठावर जाऊन बसला. ‘मात्र परिसरातून शिकारी करिता भटकणाऱ्या वाघाला शौचास बसलेला व्यक्ती हा माणूस आहे की जानवर हे न कळल्यामुळ‘ त्याने पाठीमागून हमला करून अंकुश ला जागीच ठार केले.
सकाळी सात वाजले तरी देखील मृतक अंकुश घरी परत न आल्यामुळे त्यांचे भाऊ शेतात गेले तेव्हा झोपडीत त्याची चप्पल व मोबाईल बाहेरच पडून दिसला तेव्हा याचा शोध घेतला असता.
त्याचा मृतदेह नाल्याच्या घाटात दिसून आला.
याची माहिती स्थनीक पोलीस स्टेशन शेगाव येथे व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन मौका पंचनामा केला.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार मागणी रेटून धरल्यामुळे थोडी तणावाची स्थिती निर्माण झाली. मातृभूमी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मृतदेह उशिरा उचलण्यात आला. तसेच वन विभागामार्फत परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला असून घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. तसेच पुढील तपास वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी स्थानिक ठाणेदार योगेंदरसिंग यादव, एस. बी. हजारे सहाय्यक वन संरक्षक ब्रह्मपुरी, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर शिंदेवाही, के.बी. देऊरकर वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर तसेच वनकर्मचारी उपस्थित होते.