
तळोधी (बा.):-
तळोधी बा.वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सवर्ला या गावाजवळ असलेल्या जंगलालगतच्या शेतशिवारातून एका भेडकी हरिनीचा कुत्र्यांनी पाठलाग केला. त्यामुळे भेडकी हरिनीने सावर्ला या गावात आश्रय घेतला.
याची माहिती मिळताच वनरक्षक एस.बी.पेंदाम व स्वाब नेचर केअर संस्था चे सदस्य यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या भेडकीला प्राथमिक वैद्यकीय तपासणी करिता नेण्यात आले व नंतर त्या भेडकीला जवळच्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
यावेळी वनरक्षक एस. बी. पेंदाम, स्वाब नेचर केअर संस्था चे सदस्य विकास बोरकर, महेश बोरकर,साहील सेलोकर इत्यादी उपस्थित होते.
