पक्षी शिल्प ठरले वर्धा शहराचे आकर्षण

0
355

बहार नेचर फाऊंडेशन व नगर परिषद, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने बहारचे सचिव दिलीप विरखडे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील दुसरी पक्षांची निवडणूक लोकशाही मार्गाने बॅलेट पेपर व ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास ५३००० वर्धेकर नागरीकांनी मतदान केले. वर्धेकर जनतेने नीलपंख या पक्षाची शहर पक्षी म्हणून निवड केली. विरखडे सरांच्या प्रयत्नांमुळेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या उपक्रमाची नोंद झाली. मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांच्या घरी झालेल्या मिटींग मध्येच निवडणूकीच्या रिंगणात उतरवायचे ५ उमेदवार पक्षी ब-याच दिर्घ चर्चेअंती निच्छीत करण्यात आले. बहार नेचर फाऊंडेशन चे कार्यकारी सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर सरांनी ठिपकेवाला पिंगळा या पक्षाचे नाव उमेदवार म्हणून सूचविले. त्याचे मुख्य कारण म्हणजे समाजातील घूबडां बद्दल असलेले गैरसमज, अंधश्रद्धा, भिती व तत्सम बाबींवर जनजागृती व्हावी हेच होते. निवडणूक जवळ जवळ ५६ दिवस चालली एवढ्या दिवसांत लाख-दोन लाख लोकांचे मतदान घेता आले असते व आणखी मोठा रेकॉर्ड प्रस्थापित करता आला असता. परंतू बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे सरांनी पाचही उमेदवार पक्षांची माहिती, त्यांचे निसर्गातील महत्व व आपली भूमिका लोकांना प्रथम सांगावे त्यानंतरच त्या-त्या ठिकाणी वोटींग घ्यावे याबाबत ते आग्रही होते व तेच मत सर्व सदस्यांचे सुध्दा होते. वेगवेगळ्या तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमातून आपण जनते पुढे गेलो. त्याचेच यश म्हणजे ठिपकेवाला पिंगळा या पक्षाने चौथ्या क्रमांकाचे ४८०५ मते घेतली. त्याला तिस-या क्रमांकावर यायला फक्त ८१ मते कमी पडली. एवढी दमदार टक्कर या निवडणुकीत पिंगळा या पक्षाने दिली व उभ्या राहिलेल्या पाचही उमेदवारांमध्ये लक्षवेधी ठरला.

दिस मावळला काळोख पडला दुनिया झोपली ही सारी
ठुमकत मुरडत डोळे वटारत अवतरली पिंगळा स्वारी
बहारचे कार्यकारी सदस्य डॉ. बाबाजी घेवडे सरांनी पिंगळ्यावर अप्रतिम कविता रचली.

सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत स्मृतीशेष उल्हास राणे सरांच्या प्रयत्नांमुळे अप्रतिम असे निलपंखाचे शिल्प उभे राहिले व अल्पावधीतच शहराची ओळख बनले. निवडणूक कालावधीत नगर परिषदेने निवडून आलेल्या पक्षाचे शिल्प शहरात उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानूसार त्यांनी विजयी उमेदवारासह सर्वच उमेदवार तथा राष्ट्रीय व राज्य पक्षांचे सुंदर शिल्प उभारुन बहारला अभिप्रेत असलेले शहर पक्षी निवडणूकीचे उद्दीष्ट साध्य केले याकरीता नगर परिषदेचे मनापासून आभार मानले
पिंगळा या पक्षाचे शिल्प पाहून वर्धेतील एका सरांना अस्वस्थ वाटत असून सदर शिल्प इतरत्र हलविण्याची मागणी त्यांनी केलेली असून प्रसार माध्यमातून पक्षी मित्र व विविध संघटनांनी त्यांच्या या भुमीके वर नाराजी तथा रोष दर्शविला आहे. त्याच अनुषंगाने बहारचे कार्यकारी सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर सरांची भूमिका आपण समजून घेवूया…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here