चंद्रपूर :
भद्रावती तालुक्यात माजरी वणी रेल्वेमार्गाच्या 50 मिटरवर मार्गाच्या कडेला एक वाघिण मृतावस्थेत आढळली आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर घटना माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतातील असून वन्यप्राण्यांपासून शेती पिकाचे संरक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली होती.
शिकाराच्या शोधात आलेली वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या ताराला गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले.
वनविभागाला माहिती मिळताच वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविले. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वैद्यकीय अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तसेच मृत वाघिणीला बछडे आहेत का? याविषयी माहीती घेतली जात आहे. सदर घटनेचा तपास कसून सुरू आहे.