तळोधी (बा.) : यश कायरकर.
आज पहाटे तळोधि – नागभिड हायवे वर घोडाझरी अभयारण्य नजीक आज पहाटे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पूर्ण विकसित चितळाचा अपघाती मृत्यू झाला. सदर बाब सकाळी फिरायला जाणाऱ्या येथील स्थानिक लोकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ नागभिड वनपरिक्षेत्र येतं माहिती पुरवली त्यानंतर परिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक यांनी मोक्का पंचनामा करून चितळास पुरण्यात आले. या पूर्वीसुद्धा मागच्या वर्षी याच ठिकाणी एका रानगव्यांचा नागभीड चे एका प्राध्यापक यांच्या गाडीने अपघाती मृत्यू झालेला होता . या त्यांची गाडीही पलटली मात्र सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नव्हती. अशा प्रकारच्या घटना या भागात सतत होत असतात यात कधी वन्यजीवांना तर कधी माणसांना पण आपला जीव गमवावा लागतो.
नागपुर – मुल – चंद्रपुर हायवे हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, करांडला अभयारण्य, व घोडाझरी अभयारण्य यामधून गेलेला आहे. हायवे असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहने ही भरधाव वेगाने असतात. आणि जंगलातून हा रस्ता गेल्यामुळे व वन्यजीवांचा हा भ्रमण मार्ग असल्याने वन्य प्राणी रस्त्याने ये-जा करीत असतात. नेहमी या तीन पैकी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी कधी दुचाकीला तर कधी मोठ्या वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी गंभीर जखमी किंवा अपघातात मरतात. मात्र यात फक्त चितळेच नव्हे तर वाघ, बिबट, अस्वल, सांबर, रानगवे, लांडगा,कोल्हे, या सारखी मोठी प्राणी तर साप, मुंगूस, कासव, घोरपड, सारखे सरीसृप प्राणी सुद्धा या रस्त्याच्या अपघातात मोठ्या संख्येने मारले जात आहेत. याकडे फक्त वनविभागाने, किंवा वन्यजीव प्रेमी, पर्यावरणवादी संस्था, यांनीच लक्ष देऊन चालणार नाही. तर रस्ते बांधकाम विभागाने सुद्धा या गंभीर बाबीला समजून जंगलातील, जंगलालगत च्या मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी रस्ते बांधकाम करताना . वन्यप्राण्यांच्या रस्ते अपघातात होणाऱ्या हानीची गांभीर्याने विचार करून. रस्ते बनवताना ज्या ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचे भ्रमंती मार्ग आहेत त्या त्या ठिकाणी रस्त्यावर फक्त ‘गतिरोधक’ बनवून रस्त्याला वरून जाणाऱ्या वाहनांच्या वेग मर्यादा कमी करून हे अपघात टाळता येणार नाही याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. व अश्या वन्यजीवांच्या अपघातस्थळी *’उड्डाणपुलाची’* निर्मिती किंवा ते शक्य नसल्यास रेल्वे प्रमाणे *बोगदे* (भुयारी मार्ग) निर्माण करायला हवे.
व वनविभागाच्या वतीने वाहनांच्या गतीवर नियंत्रण आणणे करता फक्त फलक लावुणच जमणार नाही. तर त्यांनीही अशा ठिकाणी बोगदे असल्यास ती जागा सोडून रस्त्याच्या दोन्ही कडेला रस्त्यावर अचानक वन्य प्राणी येऊन अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही कडेला जंगलालगत जाळी लावून. बोगद्या पर्यंत ची जागा बंद करून त्यातूनच प्राण्यांना ये-जा करता येईल अशी व्यवस्था करायला पाहिजे. जेणेकरून रस्त्यावर येऊन वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागणार नाही. ही बाब समजून घेऊन शासनानेही गंभीरतेने बघून दोन्ही विभागामार्फत नियोजन करणे आता गरजेचे झाले आहे.