ताडोबा प्रशासनातर्फे आयोजित सर्व पर्यटक मार्गदर्शकांसाठी प्रशिक्षण

0
591

चंद्रपूर : व्याघ्र दर्शनासाठी जग प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रातील पर्यटन १ ऑक्टोबर पासून सुरू होत असल्याने नेहमी प्रमाणे दरवर्षीच्या सुरुवातीच्या हंगामापूर्वी मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाचा असतो. ज्यामुळे येथे येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना योग्य मार्गदर्शन मिळावा याकरिता नेहमीच ताडोबातील पर्यटक मार्गदर्शकांना वनविभागा तर्फे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी वन विभागाने अनुज खरे आणि त्याच्या टीमने TATR च्या  सर्व मार्गदर्शकांसाठी मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वन समाचारच्या प्रतिनिधीशी संवाद साधल्यास अनुज खरे यांनी सांगितले के प्रशिक्षणाचा मुख्य फोकस सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट आणि वन्यजीवांबद्दलचे ज्ञान असून  यामध्ये व्यक्तिमत्व, मार्गदर्शकांचे संभाषण कौशल्य, सफारी कशी करावी इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. वन्यजीव विषयांमध्ये सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक इत्यादींचा समावेश आहे. तसेच ताडोबातील मार्गदर्शकांसाठी फिटनेस सत्र देखील घेण्यात आले.
ताडोबा (कोर) मार्गदर्शकांसाठी मोहर्ली गेट येथील सभागृहात घेण्यात आले असून  ताडोबा (बफर) क्षेत्रातील मार्गदर्शकांसाठी आज दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी आगरझरी कॅम्पिंग साईड येथील हॉल मध्ये घेण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणात सर्वं मार्गदर्शक उपस्थित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here