वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

0
691

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :

सिंदेवाही : सिंदेवाही वन परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र तांबेगडी मेंढा नियतक्षेत्र चिकमारा येथे  दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी  गुरे चराईस गेले गुराखी संतोष डुकरू नैताम रा. चिकमारा,  वय  63 वर्ष याला वाघाने ठार केल्याची घटना आज दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की चिकमारा येथील गुराखी १३ ऑगस्ट रोजी आपले गुरे घेऊन जंगलात चारायला गेला असता सायंकाळ ला घरी परत न आल्याने ग्रामस्थ, वनविभाग  सदस्य यांनी परिसरात शोध मोहीम राबविली.  मात्र आज चिकमारा येथील कक्ष क्र. 266 मध्ये  आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास गहाळ इसम मृत अवस्थेत आढळून आला.


सदर घटना स्थळी वनविभाग व पोलीस पथक  दाखल होऊन पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही करून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे मृत इसमाचे शव विच्छेदण करण्यात आले आहे. मृताचे नातेवाईक यांना तातडीची मदत म्हणून ₹ 25,000/- वनविभागा तर्फे देण्यात आले आहे व पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here