ताडोबा मधील कोलारा गेट जवळील वन्य विलास रिसॉर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

0
1325

चिमूर : – जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील कोलारा गेट जवळ असलेल्या देवरी (चैती) येथील वन्य विलास रिसॉर्ट मधील व्यवस्थापकाचा पाण्याची मोटार स्वच्छ करीत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १ वाजता दरम्यान वन्य विलास रिसॉर्ट मध्ये घडली.

राघूदीप भवानी पंडा  वय ३५ वर्षे असे मृतकाचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील व्हीआयपीसाठी प्रसिद्ध असलेल्या वन्य विलास रिसॉर्टचे व्यवस्थापक आपल्या कर्मचा-यांसह पाण्याची टैंक साफ करून पाणी काढण्याची मोटार दुरुस्त करण्यासाठी पाण्याच्या टँकमध्ये उतरले. कर्मचा-यांना बटन चालू बंद करण्यास सांगितले. बटन चालू करताच त्या मोटार पंपला विद्युत करंट असल्याने पंडा यांना जोरदार झटका लागला.

उपस्थित कर्मचा-यांनी मोटार पंपचा प्रवाह बंद केला. मात्र त्रिफेज विद्युत प्रवाह असल्याने पांडा खाली कोसळले.

दरम्यान उपस्थित रिसॉर्ट कर्मचा-यांनी व्यवस्थापक पंडा यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देताच पंचनामा केला. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here