वन विभागाच्या कारवाईस यश – बाघिणीचे तीन शावक ताब्यात

0
96

मुल:

मुल व सावली तालुक्यांतील नागरिकांना गेल्या सात महिन्यांपासून दहशतीत ठेवणाऱ्या नरभक्षक बाघिणीच्या तीन शावकांना अखेर सावली वनविभागाने १२ एप्रिल रोजी यशस्वीरित्या पकडले. या बाघिणीने चार जणांचा बळी घेतला असून तीन जणांना जखमी केले होते. तिला ९ एप्रिल रोजी ट्रॅप लावून पकडण्यात आले होते.

ही मोहीम मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शूटर अजय मराठे यांनी शावकांना बेशुद्ध करून पकडले.

या यशस्वी कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले असून, आता त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here