पाण्याच्या टाकीत पडलेला काळा बिबट (ब्लॅक पँथर) बाहेर कढण्यात वन विभागाला यश

0
899

जिल्ह्यात ब्लॅक पँथर चा पहिलाच रेस्क्यू

दिनांक 12 नोवेम्बर 2021 रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास मौजे गोवेरी येथील तुकाराम राऊळ यांच्या आंबा/काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या 7 ते 8 फूट खोल पाण्याच्या टाकी मध्ये काळा बिबट (ब्लॅक पँथर) पडल्याची माहिती उघड़किस आली असता त्यांनी वनविभागास माहिती दिली . माहिती मिळताच वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
7 ते 8 फूट खोल टाकीमध्ये बचाव पथकांनी पिंजरा सोडुन ग्रामस्थांच्या मदतीने काळा बिबट (ब्लॅक पँथर) ला पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढण्यात आले.
वनविभागाच्या माहितीनुसार तो शिकारच्या मागे धावत असताना  विहिरीत पडला असावा असे वर्तवले जात आहे..

सदर बिबट हा नर जातीचा असून अंदाजे 1.5 ते 2 वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकारीनी वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे म्हणाले काळा बिबट अत्यंत दुर्मिळ बिबट प्रजात असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होत असतो. जिल्ह्यात ब्लॅक पँथर चा पहिलाच रेस्क्यू आहे.

बिबट हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळनारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यांवरती ते उपजीविका करतात. बिबट हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे. काळा बिबट हा अत्यंत दुर्मिळ बिबट असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे जिल्ह्यातील जंगलाचे परिपुर्णतेचे सकारात्मक प्रतिक आहे.

कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा अडकलेल्या स्थितीत आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले.

सदर बचाव कार्य उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी ,आय. डी. जालगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ, अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अ. स. चव्हाण, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत वाहन चालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजित खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे यांच्या मदतीने यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here