(तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील तीन दिवसांत दुसरी घटना)
(जिल्हा प्रतिनिधी) यश कायरकर:
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येत असलेल्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेठी नियत क्षेत्रातील,उश्राळा मेंढा रीट, परिसर गट क्र. 2, संरक्षित वनक्षेत्र परिसरात , शेतात काम करण्यास गेलेली आकापुर येथील श्रीमती देवता जीवन चनफने वय 42 वर्ष, महिलेवर वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना उधडकीस आली..
शेत परिसरामध्ये काम करत असताना दि.12 जून 2023 रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्या परिसरात वावरणाऱ्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उधडकीस आली.
सदर घटनेनंतर वाघाने महिलेला उचलून झुडपी जंगलात नेल्यामुळे मृतदेह शोधण्यास रात्रो ९:३० वाजले.
यावेळी घटनास्थळी तळोधी बाळापुरचे अतिरिक्त कार्यभार असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात तळोधीचे क्षेत्रसहाय्यक वाळके, गंगासागर हेटी चे वनरक्षक एस.एस. कुळमेथे, तळोधी (बा) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोवर्धन, यांच्या उपस्थितीत मौका पंचनामा करून शवविच्छेदनास नागभिड येथे रवाना करण्यात आले.
मृतकाचे पती हे सुद्धा काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्यानं या घटनेनंतर मुलांवर संकट कोसळलेला आहे. यावेळी तात्काळ मदत म्हणून मृतकाच्या परिवाराला 25,000 (पंचवीस हजार) रुपये ची मदत करण्यात आली व लवकरात लवकर उर्वरित 19 लाख 75 हजार ही मदत सुद्धा परिवाराला करण्यात येणार आहे .
तरी या परिसरात वाघाचे वास्तव असल्याने शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे वनविभागा तर्फे सर्वांना सूचित करण्यात आले आहे.